गंगापूर शहरातील आंबेवाडी येथील सौ.राधाबाई आळंजकर यांचे दुःखद निधन

गंगापूर प्रतिनिधी : आंबेवाडी येथील रहिवासी सौ.राधाबाई उत्तमराव आळंजकर वय ६१ वर्ष यांचे मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी पहाटे ५.४५ वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने आळंजकर परिवारासह संपूर्ण आंबेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. सौ.राधाबाई आळंजकर यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी,सुना व नातवंडे असा परिवार आहे.त्या पत्रकार अमोल आळंजकर यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता आंबेवाडी शिवारातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button