
गंगापूर प्रतिनिधी: गंगापूर तालुक्यातील अंमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते रफायल साळवे यांची कन्या कुमारी राजश्री साळवे हिची महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.राजश्री रफायल साळवे हिने अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये हे यश मिळवले आहे.घरची परिस्थिती ही जेमतेम असताना देखील अभ्यासामध्ये सातत्य ठेवून जिद्दीने अभ्यास करत तिने हे यश मिळवले आहे.तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंमळनेर येथे झाले असून माध्यमिक शिक्षण हे सोसायटी हायस्कूल कायगाव येथे पूर्ण केले. पुढे B.E.सिव्हिल इंजीनियरिंग ही पदवी छञपती संभाजीनगर येथे पूर्ण केली आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली राजश्रीला एक भाऊ आणि दोन बहिणी असून हे सर्व उच्च शिक्षित आहे.तिचे वडील देखील उच्च शिक्षित असून त्यांचे सामाजिक चळवळीत मोठे योगदान आहे. त्यांच्या यशाबद्दल अमळनेर कायगाव व परिसरातील सर्वांनी तिचे कौतुक केले असून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत यामध्ये अमळनेर – कायगाव येथील ग्रामस्थ, गंगापूर येथील भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूलचे संस्थापक फादर विल्फ्रेड सलडाणा, जिल्हा परिषद सदस्य सुमित मुंदडा,पंचायत समिती सदस्य लक्ष्मण भाऊ सांगळे, पंचायत समिती सदस्य बळीराम खताळ, शिक्षक संघटनेचे नेते कास्ट्राईब शिक्षक संघटना गंगापूर तालुका अध्यक्ष संदीप माघाडे सर त्याचबरोबर सर्व नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या कडून राजश्रीचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.