मा.नगरसेवक प्रदीप पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला दोन लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचा धनादेश

गंगापूर प्रतिनिधी: आपल्या वाढदिवसाचा अवाजवी खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत माजी नगरसेवक प्रदीप
पाटील यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
वाढदिवसानिमित्त प्रदीप पाटील मित्र मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाख एक हजार १११ रुपयांचा निधी तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यासोबतच विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले.
आमदार प्रशांत बंब यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत आयोजित या उपक्रमांतून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. वाढदिवसाच्या सोहळ्यावर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्यात आल्याने या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. वाढदिवसानिमित्त गंगापूर येथील गोकुळ धाम गो शाळेत जनावरांना चारा देण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले,तर शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व शैक्षणिक साहित्य देण्यात आले.समाजाचे देणे फेडण्याची संधी “वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाचे देणे फेडण्याची उत्तम संधी आहे. आपल्या भागातील शेतकरी आणि नागरिक दुष्काळाशी लढा देत असताना त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे,” अशी भावना प्रदीप पाटील यांनी व्यक्त केली.या उपक्रमाला राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची उपस्थिती होती.यावेळी अॅड. किशोर कराळे, नगरसेवक विजय पानकडे, मारुती खैरे, राकेश कळसकर, भाग्येश गंगवाल, आनंद पाटील,दीपक साळवे, आबासाहेब शिरसाठ, कृष्णकांत व्यवहारे,रामेश्वर पाटील, अशोक पाटील, राजेंद्र राठोड, सचिन विधाते, बाबूभाई ब्रेडवाले, सुरेश शिंदे, आबासाहेब सवई, सुदाम भडके, अतुल रासकर, अनिल शिंदे, अरुण लांडे, आप्पासाहेब पाचपुते, भारत पाटील, अनिल राजगिरे, रईस शेख, आण्णासाहेब जाधव, बाळा राजपूत, गणेश राजपूत, महेश पाटील, रामनाथ शिंदे, किरण पाटील, शिवराज दारुंटे, गणेश मनाळ, सलीम शहा, सत्यम तुपे, ॲड. दळवी,कैलास साबणे, नितीन पदार, दादासाहेब गुडद्दे, गणेश शिंदे, उमेश भवार, प्रदीप वंजारे, अरुण सागर, सतीश बारे,निवृत्ती अभंग,लक्ष्मण आळंजकर, प्रकाश लगड, अनिल पाटील, संतोष काळे, अनिकेत पाटील, गोरख भवार, सूरज सोनवणे, मनोज गायकवाड, प्रदीप तोडगिले, मुन्ना पाटील,शिवाजी पाहुणे, अमोल कळसकर, प्रदीप राजपूत, सुरेश रासने, नंदू भवार, सचिन चिंतामणी, चंद्रकांत लांडे, उमेश सोनवणे, लतिफ शेख आदी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button