
गंगापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेची नुकतीच नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नितीन जाधव सर यांनी गंगापूर शिक्षक तालुका अध्यक्ष या पदावर संदीप माघाडे यांची नियुक्ती केली.
कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतील ठराव क्रमांक२/२०२६/१०.नुसार कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या दिनांक ४ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतील ठराव क्रमांक २/ २०२६/१० नुसार, संदीप माघाडे यांची गंगापूर तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे “तालुकाध्यक्ष” या पदावर पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येत आहे.संघटनेची ध्येयधोरणे व उद्दिष्टे यांचा प्रसार करणे, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ,संघटनात्मक पातळीवर कार्य करणे, सभासदांशी समन्वय राखणे तसेच संघटनेने वेळोवेळी दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणे, अशी अपेक्षा आहे. आपण संघटनेच्या नियमावलीनुसार व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करावे. असे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले. राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष नितीन जाधव, जिल्हा सरचिटणीस नितीन घोलप, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप बळे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र शिनगारे, विभागीय सहसचिव सुनील डोके, ज्ञानेश्वर मोकळे, रवींद्र जगताप, विजय तुपे ,प्रकाश वाघमारे , उज्वल कुमार म्हस्के,बाबासाहेब सोनवणे,वैशाली वैजनाथ सावंत इत्यादी कार्यकारणीची उपस्थितीत सदर नियुक्ती करण्यात आली.