गंगापूर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा वरखेड केंद्र मांजरी येथील सहशिक्षक रवींद्र शिनगारे सर यांची राज्यस्तरीय आयडॉल टीचर म्हणून निवड

गंगापूर प्रतिनिधी:गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वरखेड केंद्र मांजरी येथील सहशिक्षक रवींद्र शिनगारे सर यांची राज्यस्तरीय आयडॉल टीचर म्हणून नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि SCERT राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या ‘आयडॉल शिक्षक’ उपक्रमा खालील पूर्तता करणाऱ्या शिक्षकांची आयडॉल टीचर म्हणून निवड करण्यात येते.या उपक्रमाचा मुख्य उद्देश उत्कृष्ट शिक्षकांचा शोध व बँक (Pool) तयार करणे,तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अध्ययन-अध्यापनात नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या, गुणवत्ता वाढवणाऱ्या आदर्श शिक्षकांचा राज्यस्तरावर एक डेटाबेस तयार करणे.यांच्याअनुभवाचा इतर शाळांना लाभ: या शिक्षकांच्या कौशल्य व ज्ञानाचा उपयोग इतर शाळांमधील शिक्षकांसाठी उद्बोधन,तज्ज्ञ मार्गदर्शक आणि कार्यशाळांमध्ये करून घेणे. 
यशस्वी प्रयोगांचे दस्त ऐवजीकरण:आयडॉल शिक्षकांच्या यशस्वी उपक्रमांचे ऑडिओ, व्हिडिओ व शैक्षणिक साहित्यात संकलन करून ते DIKSHA किंवा राज्य संकेतस्थळांवर प्रसारित करणे. 
निवड पद्धत व मूल्यमापन निकष (१०० गुण)
शासनाच्या निकषानुसार शिक्षकांचे मूल्यमापन १०० गुणांच्या मॅट्रिक्सवर केले जाते:
निवड प्रक्रिया कशी होते?
माहितीचे आधार स्रोत: U-DISE, SQAAF (स्कॉफ पोर्टल), सरल (SARAL), दीक्षा (DIKSHA) ॲप आणि प्रत्यक्ष शाळा भेटींच्या आधारे प्राथमिक पडताळणी होते.तालुका ते जिल्हा स्तर: तालुका स्तरावरील छाननी नंतर जिल्हास्तरावर मूल्यमापन होते. प्रत्येक जिल्ह्यातून सर्वोत्तम शिक्षकांची निवड करून प्रस्ताव राज्यस्तरावर पाठवले जातात. 
राज्यस्तरीय यादी: SCERT (विद्या प्राधिकरण) मार्फत अंतिम पडताळणी करून राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ जाहीर केले जातात.आयडॉल शिक्षकांची भूमिका,तज्ज्ञ मार्गदर्शक: राज्य, जिल्हा आणि केंद्रस्तरीय शिक्षक प्रशिक्षण परिषदांमध्ये या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त केले जाते. 
मार्गदर्शक शाळा आयडॉल शिक्षकांच्या शाळांना इतर शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सदस्यांच्या अभ्यास भेटी आयोजित केल्या जातात. 
गुणवत्ता समित्या: जिल्हा व तालुका गुणवत्ता संवर्धन समित्यांमध्ये या शिक्षकांच्या अनुभवाचा प्रत्यक्ष उपयोग करून घेतला जातो. या सर्व जिल्हा व राज्य स्तरावरील चाचण्या पूर्ण करून रवींद्र शिनगारे सर यांची आयडॉल टीचर म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून नातेवाईक, शिक्षक वृंद, व मित्रपरिवार कडून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button