गंगापूर तालुक्यातील मांजरी येथील श्रीक्षेत्र श्री.मुकुंदादेवी नवरात्र उत्सव निमित्त कीर्तन महोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

गंगापूर प्रतिनिधी: गंगापूर तालुक्यातील मांजरी येथील श्रीक्षेत्र श्री मुकुंदादेवी माता नवरात्र कीर्तन महोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास रविवार दि.११ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.याची सांगता मंगळवार दि.२० ऑक्टोबर रोजी होणार आहे. या काळात दररोज काकडा भजन,विष्णु सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, संगीत भजन, हरिपाठ, कीर्तन आणि हरि जागर आदी कार्यक्रम होणार आहेत.हभप भास्करगिरी महाराज,रामगिरी महाराज,हभप रामभाऊ महाराज राऊत ,यांच्या आशीर्वादाने ह भ प कैलास गिरी महाराज, ह भ प प्रकाशनंदगिरी महाराज,१००८ महामंडलेश्वर स्वामी वोणेचरानंदगिरी महाराज, ह भ प पद्माकर महाराज पाटोळे यांच्या प्रेरणेने हा सोहळा पार पडणार आहे. ज्ञानेश्वरी कंठस्थ चंद्रकांत महाराज मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ४ ते ६ काकडा भजन, विष्णु सहस्रनाम,ज्ञानेश्वरी पारायण, संगीत भजन,होणार आहे. शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०वाजता हभप महंत रामगिरी महाराज यांचे हरिकीर्तन, सायंकाळी ४ ते ६ या वेळेत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व श्री मुकुंदादेवी सायंकाळी ४ ते ६ हरिपाठ, तर रात्री ७ ते ९ कीर्तन व हरि जागर होणार आहे.यानिमित्त हभप कोमलताई महाराज कुऱ्हाडे, हभप साध्वी वैष्णवी सरस्वती, हभप मोनिकाताई महाराज येवले,हभप सुवर्णामाई महाराज जमधडे, हभप कविताताई महाराज साबळे आणि सोमवारी दि.१९ हभप संजीवनीताई महाराज गडाख यांची कीर्तने करण्यात येत असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात येत आहे. माता प्रतिमेची मिरवणूक २० ऑक्टोबर रोजी सकाळी भागवताचार्य हभप रुक्मिणीताई महाराज हावरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल. मांजरी, माहुली, सावखेडा,कान्होबावाडी व पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी पारायणा साठी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष अंजलीताई कसाने,संतोष अंबिलवादे, बाळासाहेब रत्नपारखी, मुकुंद कसाने, कृष्णा साळुंके, चंद्रकांत मुळे, शिवाजी लांडे, मनोज कुलकर्णी, मनोज साळुंके, बाळू सोनवणे, नामदेव मिसाळ, सुनील कसाने सर्व ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button