मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात ध्वजारोहण उत्साहात, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागालाअभिवादन,रुग्णसेवेचा संकल्प अधिक दृढ

गंगापूर प्रतिनिधी: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. डॉ. सुधाकर मुंडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी,कर्मचारी आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत मराठवाड्याच्या मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन केले.मराठवाडा मुक्ती संग्राम हा स्वातंत्र्य, लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी झालेल्या संघर्षाची प्रेरणादायी गाथा आहे. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवणे आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी अतुल रासकर सदस्य रुग्ण कल्याण समिती यांनी उपस्थित राहून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. रुग्णालयातील सर्वसामान्य, गोरगरीब आणि गरजू रुग्णांना योग्य उपचार, आवश्यक मार्गदर्शन आणि संवेदनशील सेवा मिळावी, यासाठी रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका यावेळी अधोरेखित करण्यात आली.
स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी केलेल्या त्यागातून प्रेरणा घेत “रुग्णसेवा हीच समाजसेवा” या भावनेने प्रत्येक रुग्णाशी आपुलकीने आणि संवेदनशीलतेने वागण्याचा संकल्प करण्यात आला. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचा सन्मान राखण्यात आला. संपूर्ण रुग्णालय परिसरात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. स्वातंत्र्याचा अभिमान, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची जाणीव आणि जनतेच्या आरोग्याची सेवा करण्याची बांधिलकी या भावनेने कार्यक्रम पार पडला.स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची प्रेरणा घेऊन जनतेची सेवा आणि रुग्णांची सेवा अधिक प्रभावीपणे करण्याचा संकल्प हीच या दिनाची खरी प्रेरणा असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.उपस्थित अधिकारी व कर्मचारी यावेळी डॉ. सुधाकर मुंडे, अतुल रासकर – सदस्य, रुग्ण कल्याण समिती, डॉ. सूर्यवंशी, डॉ. केंद्रे, डॉ. मनोरे, डॉ. शेजूळ, डॉ. म्हस्के, सिस्टर कुलकर्णी, रुकसाना शेख, बेबी शेख, वाघ सिस्टर, पवार सिस्टर, तपसे सिस्टर, मंगेश गायकवाड, साबळे, अनिल साळुंके, मोहिते, दळे सिस्टर, लोंढे, किशोर हिवाळे आदी रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button