पहिले निवासव्यवस्था करा, मग मुख्यालयी राहण्याची सक्ती करा. शिक्षक समन्वय समितीच्या आंदोलनाला ठाकरे गट,राष्ट्रीय काँग्रेसचा पाठिंबा

गंगापुर प्रतिनिधी: ग्रामीण भागातील शिक्षकांना सुरक्षित व मूलभूत सुविधांनीयुक्त निवासव्यवस्था उपलब्ध करून दिल्याशिवाय मुख्यालयी वास्तव्याची सक्ती करू नये,या मागणीसाठी शिक्षक समन्वय समिती, गंगापूरच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढून पंचायत समितीच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रीय काँग्रेसने पाठिंबा दिला.शिक्षक समन्वय समितीने पंचायत समिती प्रशासनाला दिलेल्या निवेदनात ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांसाठी स्वतंत्र व सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध नसल्याचे नमूद केले आहे. अशा परिस्थितीत मुख्यालयी वास्तव्याची सक्ती केल्यास शिक्षकांना व्यावहारिकअडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने प्रथम शासकीय निवासव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.पती-पत्नी दोघेही शिक्षक असलेले कर्मचारी, लहान मुले तसेच वृद्ध आई वडील किंवा आजारी कुटुंबीयांची जबाबदारी असलेल्या शिक्षकांच्या परिस्थितीचा संवेदनशीलतेनेविचार करावा, अशी मागणीही समितीने केली. मुख्यालयी वास्तव्याच्या अंमलबजावणी दरम्यान शिक्षकांवर मानसिकदबाव,धमकी अथवा अनधिकृत कारवाई करू नये,तसेच त्यांचा सन्मान व सुरक्षिततेची काळजी घ्यावी,असे निवेदनात म्हटले आहे.शिक्षकांच्या मोर्चाला शासकीय विश्रामगृहापासून सुरुवात होऊन लासूर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पंचायत समिती कार्यालय गाठण्यात आले.त्यानंतर तेथे धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी ठाकरे गट व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मागण्यांना पाठिंबा दिला. ग्रामीण भागातील शिक्षकांच्या निवासव्यवस्थेचे तालुकास्तरीय सर्वेक्षण करून आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात आणि तोपर्यंत मुख्यालयी वास्तव्याची सक्तीकरू नये,अशी भूमिका समितीने स्पष्ट केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button