गंगापूर तालुक्यातील काटे पिंपळगाव येथील 39 कुणबी प्रमाणपत्र संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हस्ते वाटप

गंगापूर प्रतिनिधी: गंगापूर तालुक्यातील काटे पिंपळगाव येथील 39 कुणबी पत्राचं वाटप संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे व आमच्या भगिनी डॉ मनिषाताई मराठे यांच्या प्रयत्नामुळे काटे पिंपळगाव येथील चव्हाण, शेळके, थोरात या परिवारातील एकूण 39 कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद नुसार निघाले असून आज आम्ही सर्व परिवाराने संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे भेट घेऊन दादा यांच्या हस्ते सर्व प्रमाणपत्र स्वीकृत करण्यात आले. यावेळी दादांचा वाढदिवस असल्या कारणाने आमचा आनंद द्विगुणित झाला.व आम्ही सर्व मित्र परिवाराने दादांचे स्वागत करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button