गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील डिफ्रिजर नादुरुस्त असल्यास नवीन डिफ्रिजर उपलब्ध करून देण्याची मागणी: नगरसेविका सौ.पल्लवी शिरसाठ व डॉ.आबासाहेब शिरसाठ

गंगापूर प्रतिनिधी: गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहामध्ये मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी उपलब्ध असलेला डिफ्रिजर बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले असून, तो तातडीने सुरू करावा अथवा डिफ्रिजर नादुरुस्त असल्यास नवीन डिफ्रिजर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. शवागृहामध्ये मृतदेह सुरक्षित व योग्य तापमानात ठेवण्यासाठी डिफ्रिजरची सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र सदर डिफ्रिजर बंद असल्यामुळे मृतदेह सुरक्षित ठेवण्याबाबत अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून, मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते.निवेदनात बंद असलेल्या डिफ्रिजरची तातडीने तांत्रिक तपासणी करून तो दुरुस्तीयोग्य असल्यास आवश्यक दुरुस्ती करून कार्यान्वित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच डिफ्रिजर पूर्णपणे खराब झालेला असल्यास किंवा दुरुस्ती करणे शक्य नसल्यास रुग्णालयाच्या नियमानुसार नवीन डिफ्रिजर तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शवागृहातील ही अत्यावश्यक सुविधा नियमितपणे कार्यरत राहणे गरजेचे असून,रुग्णालय प्रशासनाने या संवेदनशील विषयाकडे प्राधान्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदर निवेदनाची दखल घेऊन डिफ्रिजरची तांत्रिक तपासणी,आवश्यक दुरुस्ती अथवा नवीन डिफ्रिजर उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी नगरसेवक सौ. पल्लवी आबासाहेब सिरसाठ व डॉ.आबासाहेब सिरसाठ यांनी केली आहे निवेदनाच्या प्रती तालुक्याचे आमदार प्रशांतजी बंब तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button