पवार रिहॅबिलिटेशन सेंटर,नवीन वास्तूचे उत्साहात उद्घाटन, आधुनिक उपचार सुविधांनी सज्ज केंद्राच्या नव्या पर्वाला प्रारंभ

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: पवार रिहॅबिलिटेशन सेंटरचे नव्या वास्तूमध्ये सुसज्ज सुविधांनी उपयुक्त असलेल्या नव्या केंद्राचे उद्घाटन दि.१ ऑगस्ट रोजी करण्यात आले.गेल्या तीन वर्षांपासून रुग्णसेवेचे अखंड व्रत जोपासत असलेल्या पवार रिहॅबिलिटेशन सेंटरच्या नवीन, अत्याधुनिक व प्रशस्त वास्तूचे उद्घाटन आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. डॉ. रेश्मा पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन वर्षांपासून हजारो रुग्णांना दर्जेदार फिजिओथेरपी व पुनर्वसन सेवा देणाऱ्या या केंद्राच्या नवीन वास्तूमुळे आता अधिक आधुनिक सुविधा रुग्णांना उपलब्ध होणार आहेत.
पवार रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये स्ट्रोकनंतरचे पुनर्वसन, पक्षाघात (Paralysis), सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, विकासातील विलंब (Developmental Delay), न्यूरोलॉजिकल विकार, स्पोर्ट्स इन्ज्युरी, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, फ्रोजन शोल्डर, सांधेदुखी,जेरियाट्रिक रिहॅबिलिटेशन, बालरुग्णांचे पुनर्वसन, स्पाईन व मस्क्युलोस्केलेटल समस्या तसेच विविध आधुनिक फिजिओथेरपी उपचार प्रभावीपणे दिले जात आहेत. डॉ. रेश्मा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवांचा लाभ गेल्या तीन वर्षांत असंख्य रुग्णांनी घेतला असून अनेक रुग्णांना पुन्हा स्वावलंबी आयुष्य जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.कार्यक्रमास आमदार विलास बापू भुमरे पाटील, माजी महापौर भगवान बापू घडामोडे, नगरसेवक राजू वैद्य, नगरसेवक कैलास गायकवाड, सौ. दयाताई कैलास गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार, डॉ. मंडळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, रुग्ण व त्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी आमदार विलास बापू भुमरे पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पवार रिहॅबिलिटेशन सेंटर हे केवळ उपचाराचे केंद्र नसून अनेक रुग्णांना नवजीवन देणारे सेवाधाम असल्याचे सांगितले. डॉ. रेश्मा पवार यांनी अत्यंत कमी कालावधीत उभारलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून भविष्यात हे केंद्र अधिकाधिक रुग्णांना दर्जेदार सेवा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी महापौर भगवान बापू घडामोडे यांनी आपल्या मनोगतात पुनर्वसन उपचारांचे समाजातील वाढते महत्त्व अतिशय सोप्या आणि प्रभावी शब्दांत स्पष्ट केले. अपघात, पक्षाघात किंवा इतर गंभीर आजारांनंतर रुग्णांना पुन्हा उभे करण्यासाठी अशा पुनर्वसन केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. रेश्मा पवार यांनी सुरू केलेल्या सेवाभावी उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक करून या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नगरसेवक राजू वैद्य, नगरसेवक कैलास गायकवाड, सौ. दयाताई कैलास गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार तसेच डॉ. मंडळ यांनीही आपल्या संभाषणातून डॉ. रेश्मा पवार यांच्या रुग्णसेवेच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. समाजासाठी अशा अत्याधुनिक पुनर्वसन केंद्राची नितांत गरज असून पवार रिहॅबिलिटेशन सेंटर भविष्यात आणखी मोठे कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमातील सर्वांत भावनिक आणि आकर्षक क्षण म्हणजे मागील तीन वर्षांत डॉ. रेश्मा पवार यांच्या उपचाराखाली पुनर्वसन झालेल्या लहान मुलांनी सादर केलेले मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम. या मुलांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. काही वर्षांपूर्वी उपचारासाठी आलेली ही मुले आज आत्मविश्वासाने रंगमंचावर उभी असल्याचे पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले. हा क्षण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.आपल्या मनोगतात डॉ. रेश्मा पवार यांनी सर्व उपस्थित मान्यवर, नागरिक, रुग्ण व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक आभार मानले. डॉ. रेश्मा पवार यांनी आपल्या यशामागे आई-वडिलांचा आशीर्वाद हेच सर्वात मोठे बळ असल्याचे सांगितले. तसेच मागील तीन वर्षांपासून पवार रिहॅबिलिटेशन सेंटरवर विश्वास ठेवून सातत्याने उपचार घेणाऱ्या सर्व रुग्ण, त्यांच्या पालक आणि कुटुंबीयांचे त्यांनी विशेष आभार मानले. त्यांच्या विश्वासामुळेच आज नवीन वास्तूमध्ये अधिक सक्षम आणि आधुनिक सेवा देण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही रुग्णकेंद्री, दर्जेदार आणि सेवाभावी उपचार देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.या नवीन वास्तूच्या उभारणीत मोलाचे मार्गदर्शन करणारे आर्किटेक्ट इंजी. सुधीर डिक्कर यांचे डॉ. रेश्मा पवार यांनी विशेष आभार मानले. रुग्णांच्या सोयी, सुरक्षितता आणि आधुनिक उपचारपद्धती लक्षात घेऊन त्यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे ही आकर्षक, सुसज्ज आणि कार्यक्षम वास्तू साकार झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उद्घाटन सोहळा यशस्वी आणि सुरळीत पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे श्री. विजय पोफळे यांचेही डॉ. रेश्मा पवार यांनी मनःपूर्वक आभार मानले. उपस्थित सर्व मान्यवर, नागरिक, रुग्ण, पालक आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात, आनंदात आणि दिमाखात पार पडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.पवार रिहॅबिलिटेशन सेंटरच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनाने संस्थेच्या रुग्णसेवेच्या प्रवासात एक नवे पर्व सुरू झाले असून, डॉ. रेश्मा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र आगामी काळात अधिक आधुनिक सुविधा, अधिक प्रभावी उपचार आणि अधिक व्यापक रुग्णसेवा देत समाजातील गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button