गंगापुर आगारातील जेष्ठ चालक श्री.हरिश्चंद्र काळे व श्री.बालाजी दवणे यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

गंगापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील छत्रपती संभाजीनगर विभागात असलेल्या गंगापूर आगारातील जेष्ठ चालक हरिश्चंद्र काळे व बालाजी दवणे हे प्रदीर्घ सेवा करून 31 जुलै 2026 रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.जेष्ठ चालक हरिश्चंद्र काळे हे 1996 मध्ये एस.टी.महामंडळात चालक या पदावर रुजू झाले.ते गंगापूर तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी आहेत.त्यांना 1993मध्येच चालक या पदावर घेण्यात आले, परंतु विभागात चालक स्थिती चांगली असल्याने त्यांना कामावर घेतले नव्हते त्यामुळे त्यांना 1996 मध्ये चालक या पदावर रुजू करून घेण्यात आले.सर्व प्रथम गंगापूर आगार देण्यात आले.तेव्हा पासून ते गंगापूर आगारात कार्यरत आहेत.त्यांनी 1996 ते 2011 पर्यंत चालक या पदावर कार्य केले. त्यांना 2011ला अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना त्यांचा एक डोळा गमवावा लागला.त्यानंतर त्यांनी शिपाई या पदावर पुढील कर्तव्य पार पाडले.एकूण 30 वर्षाची सेवा त्यांनी अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने पार पाडली.त्याच प्रमाणे दुसरे जेष्ठ चालक बालाजी संभाजी दवणे हे लातूर जिल्ह्यातील एलादेवी उमरगा येथील रहिवासी असून ते छत्रपती संभाजीनगर विभागातील गंगापूर आगारात 2001 मध्ये चालक या पदावर रुजू झाले.अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने त्यांनी चालक पदाचे काम पूर्ण करून 31 जुलै 2026 रोजी 25 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त होत आहे.ते लांब पल्याची सेवा करण्यात सदैव तत्पर राहात असे.त्यांच्या सेवा पूर्ती सत्कार समारंभाचे अध्यक्ष तथा गंगापूर आगारातील आगार प्रमुख विजय बोरसे ,सहाय्यक वाहतूक अधीक्षक भापकर, वाहतूक निरीक्षक उज्वला जारवाल उपस्थित होते.प्रमुख अतिथी बाबासाहेब साळुंके पाटील प्रा.सचिव एस.टी. कामगार संघटना,आगार अध्यक्ष दिलीप मनाळ,आगार सचिव निरज वैजापूरकर,नंदकिशोर जाधव,सोन्याबापू कळमकर, साईनाथ भालेराव,संजय कापसे, गणेश पाटील, जितेंद्र शिंदे, संतोष वानखेडे,राहूल सुरडकर, जालिंदर जायभाये, बि. डी. लांडगे, दिपक माळी, जीवन दलाल,राजेश बडे, खंडू राजेमोड, केशव तपासे,नारायण शेळके,गणपत इंजेवाड,गणेश कराळे,पौर्णिमा पगारे, राधा साळवे,सदावर्ते मॅडम,ज्योती भोळे ,निलोफर पठाण,भगत मॅडम,स्वाती बिराजदार, सेवानिवृत्त संघटनेचे रघुनाथ दिवटे,प्रकाश चित्ते,भगवान बैनाडे, सुंदरराव वाघ,दिलीप बनकर,विक्रम धनवटे,चव्हाण संभाजीनगर, मच्छिंद्र भुजबळ,विजय ढंगारे,ए.बी. सोनवणे,विनायक लोणकर, सोपाण टिकल,संजय साळुंखे इत्यादी कर्मचारी चालक,वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी, नातेवाईक, गावकरी व मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार लक्ष्मीकांत माघाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन नारायण शेळके यांनी मानले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button