गंगापूर महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात कार्यालयातील अधिकारी यांना देशी दारू भेट.

गंगापुर प्रतिनिधी: गंगापूर शहरातील महावितरणच्या
कामात निष्काळजीपणा करण्याऱ्या अधिकारी व दारू पिऊन बेजबाबदारपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कार्यवाही करण्यासाठी महावितरण कार्यालयास देशी दारू भेट देण्यात आली असून आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.महावितरणचे उपकार्यकारी अभियंता काळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आपल्या महावितरणचे काही कर्मचारी हे कामावर असताना सतत दारूच्या नशेत असतात व कामावर असताना शहरात कुठेही विद्दूत वितरणाची अडचण आल्यास नागरिकांचे फोन उचलत नाही. व थातूर मातुर उत्तर देऊन वेळ मारून नेतात. काल गंगापूर शहरात सायंकाळी जोराचा वारा व पाऊस झाला त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांदया तुटून विददूत पोल वरील तारा तुटल्याने विद्दूत पुरवठा खंडित झाला.त्यातच वैजापूर रोड वरील शहरा लगतच्या शेत वस्ती वर अनेक ठिकाणी विददूत पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी महावितरणच्या कर्मचारी यांना फोन केला असता काही कर्मचारी हे दारूच्या नशेत असल्याने त्यांनी अनेक नागरिकांचे फोन उचलले नाही व नंतर फोन स्विच ऑफ करून टाकले यावरून महवितरणच्या कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा व आपल्या कर्तव्याच्याबाबतीत उदासीनता दिसून आली आहे.
यावर अधिकाऱ्यांचा कुठलाही वचक राहिलेला नाही.
काही कर्मचारी तर चक्क दारू पिऊन कर्तव्यावर हजर असतात त्यांच्या कडून कुठलेही काम होत नसून केवळ दारू पिणे हीच त्यांची ड्युटी समजतात.त्यामुळे विद्युत वितरण कंपनी विषयी शहरात नाराजी पसरली असून शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांदया विददूत तारेवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा पूर्वी ह्या झाडांच्या फांदया त्वरित तोडण्यात याव्या.व तालुक्यातील सोलार सर्वे साठी काही लाईनमन हे पैसे उकळत असून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे ते तात्काळ थांबवण्यात यावी. व शहरातील बत्तीसे डीपी, पठाण डीपी, डोके डीपी, पटेल स्वामी डीपी व गंगापूर शहरातील इतर सर्व डीपी यांच्यावरील केबलचे काम तातडीने पूर्ण करणे
तुळशीबाग डीपी वरील सर्व दुरुस्ती तातडीने करून घेण्यात यावी व कामचुकार दारुड्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.या दारुड्या कर्मचाऱ्यांचा प्रतीकात्मक निषेध म्हणून आपणांस देशी दारूची बाटली भेट देण्यात येत आहे व तसेच या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी,कारवाई न झाल्यास व गंगापूर शहर व तालुक्यातील विददूत वितरणचा कारभार सुरळीत न झाल्यास
गंगापूर शहरातील नागरिकांच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला असून निवेनावर गंगापूर नगरपरिषदेचे उपनगरअध्यक्ष अमोल जगताप, नगरसेवक अख्तर सय्यद, राहुल वानखेडे, नगरसेवक नवनाथ कानडे, गुलाम शहा, हनिफ बागवान, अनिल चव्हाण, तुकाराम सटाले, स्वप्नील गायकवाड, आकाश बुचडे, कैलास बनकर, निलेश शेळके, किरण पोळ,गोविंद वल्ले, पवन जाधव, गणेश राजपूत, अजय बत्तीसे आदिच्या सह्या आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button