गंगापूर तालुक्यातील वसुसायगाव येथे शेतकरी मार्गदर्शन,नैसर्गिक शेती,जैविक निविष्ठा निर्मिती आणि फ्रेमवर्क ॲपची माहिती

गंगापूर प्रतिनिधी: गंगापूर तालुक्यातील वसुसायगाव येथे दिनांक दोन जुन मंगळवार रोजी कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शांताराम शेजवळ होते.उपसरपंच रामहरी नरोडे यांची ही उपस्थिती होती.शेतातील उपलब्ध संसाधनांपासून जैविक निविष्ठा कशा बनवाव्यात, याबत आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिलीप मोटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्याने उत्पादन खर्च कमी होऊन जमिनीची सुपीकता वाढते, असे त्यांनी सांगितले.सहाय्यक कृषी अधिकारी दीपक फाजगे यांनी ‘फ्रेमवर्क फर्टीलायझर सेल’ ॲपची माहिती दिली. शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी आत्मा अंतर्गत नोंदणीकृत राजे संभाजी राजे शेतकरी बचत गट आणि राजमुद्रा शेतकरी बचत गटाचे सदस्य उपस्थित होते. शेतकऱ्यांनी संघटित नैसर्गिक शेती करण्यावर चर्चा केली. तसेच विविध जैविक निविष्ठा स्वतः तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button