गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाची नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी केली अचानक पाहणी

गंगापूर प्रतिनिधी: गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली अचानक भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सेवांची पाहणी करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष अमोल जगताप तसेच नगरसेवक संतोष अंबिलवादे, योगेश पाटील, फैसल चाऊस, नवनाथ कानडे, अनिस बाबा,अजित राजपूत, सोपान देशमुख, सय्यद अख्तर, मुकुंद जोशी व राहुल वानखेडे उपस्थित होते.पाहणी दरम्यान रुग्णालयात पुरेशा प्रमाणात डॉक्टर,नर्स व कर्मचारी उपलब्ध आहेत का, नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेवर मिळत आहेत का तसेच रुग्णांना योग्य व तत्पर उपचार मिळत आहेत का याची प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली.
यावेळी उपचार सुरू असलेल्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करण्यात आली. तसेच रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करून नागरिकांना अधिक चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या.गंगापूर शहरातील नागरिकांना शासकीय आरोग्य सेवांचा अधिकाधिक लाभ मिळावा व कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय भाऊ जाधव यांनी यावेळी दिले.
“नागरिकांचे आरोग्य प्रथम, हाच प्रशासनाचा संकल्प!” या भावनेतून ही पाहणी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button