राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी कल्याण गायकवाड यांची नियुक्ती

गंगापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या गंगापूर तालुकाध्यक्षपदी गळनिंब येथील कल्याण गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते त्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्षाचे ध्येयधोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचवून गंगापूर तालुक्यात पक्ष संघटन प्रभावी व मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करत आमदार सतीश चव्हाण यांनी कल्याण गायकवाड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी नगराध्यक्ष संजय जाधव, प्रदेश सरचिटणीस दिलीप बनकर, रामेश्वर चव्हाण, संतोष गायकवाड आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन- आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारताना कल्याण गायकवाड. सोबत नगराध्यक्ष संजय जाधव, दिलीप बनकर आदी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button