भेंडाळा येथे भगवान बुद्धाच्या २५७० व्या जयंतीनिमित्त मगध धम्म प्रशिक्षण संस्था ध्वजारोहण व नाम फलकाचे उत्साहात उद्घाटन

गंगापूर प्रतिनिधी: गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे मगध धम्म प्रशिक्षण संस्थाचे ध्वजारोहन व नामफलकाचे उद्घाटन प्रमुख
आतिथींच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.दिनांक 15 मे शुक्रवार रोजी मगध धम्म संस्कार प्रशिक्षण संस्था भेंडाळा येथे मगनराव बाळाजी तुपे यांच्या गट क्रमांक ४३ मौजे भेंडाळा शिवरामधील धम्म प्रशिक्षणाच्या कार्यासाठी दान केलेल्या जमिनीवर तथागत भगवान बुद्धाच्या २५७०व्या वैशाख त्रिविधी पौर्णिमेच्या निमित्ताने धम्म ध्वजारोहण व नाम फलकाचे अनावरण तसेच बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो (कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो (कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिकू संघ) यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच नाम फलकाचे अनावरण सुमित मुंदडा (जिल्हा परिषद सदस्य) यांच्या वतीने करण्यात आले, मगध धम्म संस्कार प्रशिक्षण संस्था भेंडाळा यांना कुठल्याही भौतिक सुविधांची गरज पडल्यास मी तात्काळ मदत करीन असे वचन सुमित मुंदडा यांनी दिले. व सर्व आदरणीय भन्तेजी व भिक्खु संघ यांच्या उपस्थितीमध्ये भेंडाळा येथील सर्व उपासक यांच्या उपस्थितीत बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. जमीन दाते मगनराव बाळाजी तुपे यांचा सहकुटुंबिक सत्कार जिल्हा परिषद सदस्य सुमित मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच आदरणीय भिक्खू डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो (छत्रपती संभाजीनगर) व भिकू इंदवंश महाथेरो (छत्रपती संभाजीनगर) यांनी प्रमुख धम्मदेसना दिली यात प्रामुख्याने बौद्ध धर्माचे तत्वे व आज बौद्ध धर्माची गरज तसेच दानाचे महत्त्व व मगन बाळाजी तुपे व कुटुंबीय यांनी केलेल्या दानाच्या संदर्भात भेंडाळा येथे बौद्ध धम्माच्या अनुषंगाने महान कार्य घडवून आले. या संदर्भात धम्मदेसना देण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलबाई पोपट गाडेकर (सरपंच भेंडाळा) तसेच प्रमुख अतिथी मालती लक्ष्मण भाऊ सांगळे (सदस्य, पंचायत समिती गंगापूर) बळीराम वसंत खताळ (सदस्य,पंचायत समिती गंगापूर) यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मच्छिंद्र परभणे गुरुजी, विजय ठोळे, रामनाथ तुपे, राहुल विजय तुपे (उपसरपंच भेंडाळा) संजय तुपे,किरण तुपे, आनंद तुपे, रामेश्वर परभणे(माजी सरपंच भेंडाळा) राजेंद्र सवाई, शांतवन खाजेकर (भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कार्यकारणी), लक्ष्मण माघाडे, (शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा गंगापूर) राजेंद्र चित्ते, (अध्यक्ष गंगापूर तालुका भारतीय बौद्ध महासभा ) अरविंद खाजेकर (सचिव भारतीय बौद्ध महासभा गंगापूर शहर)तसेच पंचक्रोशीतील विविध गावातील नागरिक व भेंडाळा येथील बौद्ध उपासक, उपासिका नातेवाईक मोठ्या संख्येने हजर होते.या
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राध्यापक संजय तुपे सर यांनी केले. तर आभार भागिनाथ कीर्तीशाही यांनी मांडले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button