गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे २५७० व्या बुद्ध जयंती निमित्त धम्म ध्वजारोहण व नाम फलकाचे अनावरण

गंगापूर प्रतिनिधी: गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे
शुक्रवार दि.१५/०५/२०२६ रोजी सकाळी १०:००वाजता मगध धम्म संस्कार प्रशिक्षण संस्था नाम फलकाचे अनावरण व धम्म ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला आहे, तरी तालुक्यातील सर्व उपासक – उपासिकानी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.आज मनुष्य भौतिक सुखाच्या मागे धावत आहे. तरी सुध्दा त्याला मानसिक सुख प्राप्त होत नाही,तथागत बुध्द म्हणतात, तृष्णा व आसक्ती या दुःखाचे कारण आहे. ते नष्ट करण्यासाठी अध्यात्मिक परिकाष्ठा करावी लागते.त्यासाठी आपण तयार नाही. त्यामुळे जीवनात दुःख आहे. करिता तथागतांनी सांगीतलेल्या आर्य अष्टांगीक मार्गानेच दुःख दूर होऊ शकते.असा जीवनाचा महान विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्विकारला व आपल्या लाखो अनुयायांना या पवित्र मार्गाने ते घेऊन गेले आहेत.तोच आदर्श समोर ठेऊन भेंडाळा ता.गंगापूर येथील श्रध्दावान उपासक मगन बाळाजी तुपे,पत्नी शकुंतला मगन तुपे,मुलगा अमोल मगन तुपे, मुलगा प्रदीप मगन तुपे या सर्वांच्या संमतीने गट क्र. ४३
मौजे भेंडाळा शिवारामधील मालकी हक्काची २० गुंठे जमीन धम्म प्रशिक्षणाच्या कार्यासाठी दान केलेली आहे.त्या जमीनीवर तथागत भगवान बुध्दांच्या२५७० व्या वैशाख त्रिविध पौर्णिमेच्या निमित्ताने धम्म ध्वजाराहेन व नाम फलकाचे अनावरन तसेच बोधीवृक्षाचे रोपन करण्यात येणार आहे.शुक्रवार दि. १५/०५/२०२६ सकाळी ठीक १०:०० वा.पंचरंगी धम्म ध्वजारोहन भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो (कार्याध्यक्ष, अखिल भारतीय भिक्खू संघ) यांच्या हस्ते संपन्न होईल.तर नाम फलकाचे अनावरन मा.दिपा सचिन मुंदडा ( जिल्हा परिषद सदस्य,जामगांव सर्कल) हे करतील.या
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.कमलबाई पोपट गाडेकर सरपंच हे भूषवतील तर प्रमुख अतिथी मा.मालती लक्ष्मण (भाऊ) सांगळे, मा.बळीराम वसंत खताळ
सदस्य,पंचायत समिती गंगापूर हे असतील.या प्रंसगी प्रमुख धम्मदेसना भिक्खू डॉ. एम. सत्यपाल महाथेरो छ.संभाजीनगर,
भिक्खू इंदवंश महाथेरो, भीखू बोधिधम्मा हे करणार आहे. तरी सर्व उपासक,उपासिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धार्थ मित्र मंडळ व सर्व बौद्ध उपासक मंडळी भेंडाळा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button