
गंगापूर प्रतिनिधी: गंगापूर तालुक्यातील मांजरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आयोजित मांजरी माहुली प्रीमियर लीग 2026 क्रिकेट स्पर्धा अंतिम फायनल सामना लढत निळकंठेश्वर माऊली आणि प्रशांत दादा क्रिकेट क्लब यांच्या मध्ये झाली.या सामन्यात माहुली संघाने प्रथम फलंदाजी करत धाव संख्या शंभर पार केली. विजयासाठी प्रशांत दादा क्रिकेट क्लब यांच्या वतीने अखेर पर्यंत चिवट झुंज देत सामना अखेरच्या चेंडू पर्यंत शर्थीची झुंज दिली परंतु अखेर शेवटी निळकंठेश्वर माऊली संघाने विजय मिळवला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मंगेश लांडे हा ठरला. द्वितीय पारितोषिक प्रशांत दादा क्रिकेट क्लब यांनी पटकाविला आहे आणि आदर्श संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट क्लब आणि पचपिंड क्रिकेट क्लब या दोन्ही संघांना विभागून देण्यात आले. मॅन ऑफ द सिरीज मंगेश लांडे, उत्कृष्ट झेल आयुब शेख, बेस्ट बॉलर अन्वर पठाण, सलग चार षटकार विनोद रोकडे, प्रथम हॅट्रिक सुनील धनवटे, सर्वाधिक स्कोर संजय तात्या सीसी, असे अनेक वैयक्तिक बक्षीस देण्यात आली.या सामन्याच्या बक्षीस वितरणासाठी प्रथम पारितोषिक 31 हजार रुपये श्री.संतोष ज्वेलर्स गंगापूरकर नगरसेवक गंगापूर गणेश अंबिलवादे यांच्या वतीने देण्यात आले तर द्वितीय पारितोषिक माजी सरपंच बापूसाहेब पाटील साळुंखे 21 हजार रुपये उपविजेत्या संघास देण्यात आले.आदर्श संघासाठी पाच हजार एक रुपये राजेन्द्र तारू सर यांचे कडून देण्यात आले. बक्षीस वितरणासाठी उपस्थित देवचंद पाटील साळुंके,अशोकराव साळुंखे, रमेश नाना सोनवणे, दत्तात्रय सुंब, मनोज काका साळुंखे,राजेंद्र माघाडे, सत्यजित क्षीरसागर, यश कसाने , सुनील शिंदे, कृष्णा साळुंखे ,किरण कसाने, प्रवीण साळुंखे ,कल्याण लांडे, सुनील कसाने, आप्पासाहेब रोकडे ,संजय सुंब,, शरद सुंब, दादाभाऊ लोहकरे, सुरेश साळुंखे मधुकर साळुंखे ,राजेंद्र कसाने, जावेद शेख ,अब्दुल शेख, मुन्ना शेख ,प्रकाश लांडे, अशोक लांडे शिवाजीराव लांडे, पदमनाथ लांडे, आसिफ शेख, योगेश मिसाळ, वसंत मिसाळ, सुमित नरवडे, अशोक कसाने, सज्जन कनसे, भीमराज माघाडे,बापूसाहेब परोडे तसेच सर्व उपस्थित गावकरी आणि क्रिकेट प्रेमी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने संपूर्ण मांजरी माहुली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.
या सामन्यासाठी प्रथम आणि द्वितीय विजेते संघाचे ट्रॉफी सौजन्य अमोल मालकर यांच्या वत्तीने देण्यात आले तर स्पर्धेतील सर्व मॅच विनर मानकरी यांना मेडल आणि ट्रॉफी सौजन्य श्रीकृष्णा पाटील साळुंके यांच्या वतीने देण्यात आले .स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल आयोजकांकडून सर्व गावकऱ्यांचे आणि क्रिकेट प्रेमींचे आभार व्यक्त करण्यात आले.